क्रांतीज्योत फेरीने आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाची वातावरणनिर्मिती

लांजा : तळवडे (ता. राजापूर) येथे होणार असलेल्या आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी राणी लक्ष्मीबाई क्रांती ज्योत फेरी काढण्यात आली. तिचा प्रारंभ कोट (ता. लांजा) येथे झाला. सरपंच सौ निशिगंधा नेवाळकर यांच्या हस्ते क्रांतीज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.

आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रकाश देशपांडे

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य तळवडे गावात १० ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे आधारस्तंभ आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले प्रकाश देशपांडे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.

‘ग्रामविकासाचा रथ उत्तम प्रकारे हाकणारे सुधाभाऊ पेडणेकर आदर्शवत’

लांजा शहरातील नवोदित लेखक, पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी लिहिलेल्या “जनसेवक सुधाभाऊ” या पुस्तकाचे श्री. गंगावणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

नवलेखकांसाठी प्रशिक्षण आवश्यक

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २५ फेब्रुवारीच्या अंकाचे संपादकीय

प्रसाद कुलकर्णींच्या आनंद यात्रेने साहित्य संमेलनात ऊर्जा

डॉ. वि. शं. चौघुले नगरी (प्रभानवल्ली, ता. लांजा) : गावी सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या विविधांगी कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या आनंद यात्रा या कार्यक्रमातून नर्म विनोदाची पखरण करत वि. शं. चौघुले साहित्यनगरी सकारात्मक ऊर्जेने भारून टाकली.

ऐतिहासिक प्रभानवल्ली गावात रंगले ग्रामीण साहित्य संमेलन

डॉ. वि. शं. चौघुले नगरी (प्रभानवल्ली, ता. लांजा) : मायमराठी भाषेचा गौरवदिन एका आठवड्यावर येऊन ठेपला असताना, विशाळगडाच्या पायथ्याशी, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या मुचकुंदी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावी अडीच दिवसांचा अक्षरमेळा भरला.