‘टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी हवी; पण शेतकरीहितासाठी सध्याचे नियम जाचक’

वाइन उत्पादनाचे नियम आणि निकष केवळ बड्या उद्योजकांना अनुकूल ठरतील असेच आहेत. केवळ द्राक्षांपासूनच नव्हे, तर अनेक फळांपासून वाइन करता येते. वाइननिर्मितीची ही प्रक्रिया कोणताही छोटा शेतकरी किंवा उत्पादक घरच्या घरी करू शकतो; मात्र सरकारचे सध्याचे नियम त्याला तशी परवानगी देत नाहीत, असा दावा या विषयात अनेक यशस्वी प्रयोग केलेले दापोलीतील उद्योजक माधव महाजन यांनी केला आहे. वाइन म्हणजे दारू नव्हे, तर ते पोषणमूल्य असलेले पेय असल्याने अगदी चहा टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी मिळायला हवी, असेही त्यांचे म्हणणे आहे.

दापोलीत कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत प्रवेश सुरू

दापोली : ज्या मुलाला ऐकू येत नाही, जे मूल बोलू शकत नाही, अशा मुलांसाठी येथील कर्णबधिर विद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.

वटपौर्णिमेच्या औचित्याने दापोलीत वटवृक्ष रोपांचे मोफत वितरण

दापोली : वटपौर्णिमेच्या निमित्ताने येथे वटवृक्षाच्या रोपांचे मोफत वितरण करण्यात आले. प्रत्येक घरामागे एक वृक्ष लावण्याचा उपक्रम दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानने आखला आहे.

कर्णबधिर बालकांच्या पुनर्वसनासाठी हवे आहेत स्वयंसेवक

रत्नागिरी : पुण्यातील हिंदुराज मित्र मंडळ या नामवंत सेवाभावी संस्थेने दापोलीत काम कर्णबधिर बालकांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले असून त्याकरिता स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. समाजातील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी : दापोली दौऱ्यात आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

दापोली : ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांनी करणे आवश्यक आहे. लॉकडाउनच्या काळात गेले अनेक दिवस नागरिक घरामध्ये होते. परंतु घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी,’ असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. आज (२० नोव्हेंबर) दापोली उपजिल्हा रुग्णालयास त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

दापोली-खेड रस्त्यावर पितांबरी नर्सरी शॉपी सुरू; वैविध्यपूर्ण रोपांची उपलब्धता

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड रस्त्यावर नारगोली येथे ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’तर्फे पितांबरी नर्सरी शॉपी सुरू करण्यात आली आहे. ‘पितांबरी’चे सीईओ मधुकर पुजारी यांच्या हस्ते नुकतेच या शॉपीचे उद्घाटन करण्यात आले. ‘पितांबरी’चे प्रॉडक्शन हेड अमित काळे, पितांबरी नर्सरीचे प्रमुख गुरुप्रसाद बेर्डे, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर पराग साळवी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.