शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज
रत्नागिरी तालुक्यातल्या कुरतडे गावातील कातळवाडी, तसेच डुगवे गावाच्या
परिसरात परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज
रत्नागिरी तालुक्यातल्या कुरतडे गावातील कातळवाडी, तसेच डुगवे गावाच्या
परिसरात परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
रत्नागिरीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर डुगवे या गावातील ओढ्यात एका पाषाणावर वैशिष्ट्यपूर्ण असे स्वयंभू श्री क्षेत्र लोटेश्वर वसलेले आहे. पावसाळ्यात तर इथले निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. त्याचा व्हिडिओ आणि त्या मंदिराविषयीची आख्यायिका येथे देत आहोत.
रत्नागिरी : खो-खो हा अस्सल भारतीय खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे ज्येष्ठ संघटक मुकुंद विष्णू आंबर्डेकर यांचे ८ डिसेंबर २०२१ रोजी पुण्यातील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कोकणातील कुरतडे (ता. जि. रत्नागिरी) हे त्यांचे मूळ गाव.
सहा सप्टेंबर रोजी यंदाचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे. त्या निमित्ताने, रत्नागिरीतला युवा कलाकार प्रहर महाकाळ याने बासरीवादनाचा विशेष व्हिडिओ तयार केला आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या कुरतडे गावाजवळच्या डुगवे नावाच्या गावात एका पाषाणावर असलेल्या श्री लोटेश्वर मंदिराच्या नयनरम्य परिसरात प्रहरने हे बासरीवादन केले आहे. हा व्हिडिओ सोबत देत आहोत.
रत्नागिरी : सरपंचपदावर माझी झालेली निवड म्हणजे महिला बचत गटांच्या चळवळीचा सन्मान आहे. सरपंच म्हणून काम करताना बचत गटांमधील महिलांच्या सक्षमीकरणावर मी भर देणार आहे, असे प्रतिपादन कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील नवनिर्वाचित सरपंच सौ. ज्योती सत्यवान रहाटे यांनी केले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचा शोध लागला असून दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. कुरतडे (ता. रत्नागिरी) येथेही कातळामध्ये खोदलेल्या काही चित्रकृती निदर्शनाला आल्या असून, त्याबाबत अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.