बचत गटांमधील महिलांच्या सक्षमीकरणावर भर – सौ. ज्योती रहाटे

रत्नागिरी : सरपंचपदावर माझी झालेली निवड म्हणजे महिला बचत गटांच्या चळवळीचा सन्मान आहे. सरपंच म्हणून काम करताना बचत गटांमधील महिलांच्या सक्षमीकरणावर मी भर देणार आहे, असे प्रतिपादन कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील नवनिर्वाचित सरपंच सौ. ज्योती सत्यवान रहाटे यांनी केले.

कुरतडे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेना पुरस्कृत पॅनेलने ग्रामपंचायतीवर विजय मिळविला. सरपंचपदाची निवडणूकही बिनविरोध झाली. निवडी जाहीर झाल्यानंतर सौ. रहाटे यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. रहाटे गेली कित्येक वर्षे महिला बचत गटाच्या सदस्य आहेत. सरपंच म्हणून काम करताना या अनुभवाचा आपल्याला उपयोग होईल आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यावर आपण भर देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष देतानाच गावाच्या विकासाच्या विविध अभियानांमध्ये गावाचा सहभाग असलाच पाहिजे, याकडे मी लक्ष देणार आहे. त्याद्वारे गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. निवडणूक न होता बिनविरोध निवड करून ग्रामस्थांनी जो विश्वास दाखवला, तो सार्थ ठरवतानाच निष्पक्षपातीपणे काम करण्याला मी कटिबद्ध आहे, असेही त्या म्हणाल्या.

निवडीनंतर जि. प. सदस्या सौ. देवयानी झापडेकर, महेंद्र झापडेकर, भाऊ गांगण यांनी नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. निवडून आलेले सदस्य असे – सरपंच सौ. ज्योती सत्यवान रहाटे, उपसरपंच अनिल वासुदेव भाटकर, सदस्य – सुभाष गणपत भोवड, सौ. रुचिता नीलेश भातडे, सौ. प्रतीक्षा पालवकर, सौ. विधी फुटक, सौ. सलोनी बंडबे, संतोष आग्रे, सूरज जाधव.

कुरतडे गावाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नितीन आग्रे, बाबू पालवकर, अजित पवार, मनोहर भातडे, सुरेश करसोडे, सुभाष पानवलकर, संजय पोशे, प्रभाकर शिंदे, अर्जुन पवार, दत्ता कालकर, मारुती गोविलकर, उमेश भाटकर, सुरेश लोहार, रूपेश लोहार इत्यादी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
…………………
फोटो ओळी –

कुरतडे गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. ज्योती रहाटे आणि सदस्यांचे अभिनंदन करताना शिवसेना हरचिरी विभागप्रमुख महेंद्र झापडेकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. देवयानी झापडेकर, उपविभागप्रमुख : दत्तात्रय (भाऊ) गांगण, पंचायत समिती सदस्या सौ. विधी भातडे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply