रत्नागिरीत माशांपासून मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन

रत्नागिरी : येथील मांडवी पर्यटन संस्था आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी २ ते ५ या वेळेत जिल्हा भाजपा कार्यालयात हे शिबिर होईल.

माशांपासून फिश क्रिप्सी, फिश वडा, फिश शेव, खेकडे यांपासून सूप, कोळंबीपासून लोणचे, सूप, जवळा चटणी, कालवांचे लोणचे अशा अनेक पदार्थांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. कोकणात मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणात होते. याचा पुरेपूर उपयोग करून कोकणातील महिला आणि हॉटेल व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी या प्रशिक्षणाद्वारे मदत होणार आहे. कोळंबी, मासे, खेकडे, कालवी यापासून विविध पदार्थ कोकणातील रेस्टॉरंट, निवास न्याहारी केंद्रे याठिकाणी उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांना जेवणामध्ये त्याचा आस्वाद घेता येणार आहे.

हा कार्यक्रम कोकण कृषी विद्यापीठाचा मत्स्यप्रक्रिया तंत्रज्ञान आणि सूक्ष्म जीवशास्त्र विभाग तसेच मत्स्य महाविद्यालयाच्या मदतीने होणार आहे. प्रशिक्षण देण्यासाठी मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. आशीष मोहिते आणि त्यांचे प्रशिक्षित सहकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून तो मर्यादित ठेवण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थींना मास्क अनिवार्य आहे.

संपर्कासाठी –

प्रशिक्षणार्थींनी नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आत्मनिर्भर भारतचे रत्नागिरी द. जिल्हा संयोजक राजीव कीर यांनी केले आहे. संपर्कासाठी ऐश्वर्या जठार (9503955454), ॲड. मनोहर दळी (7709521010) ॲड. नीलेश आखाडे (9860625740) आणि संदीप सुर्वे (7743895930).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply