रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत आजही वाढ झाली असून आज (२० फेब्रुवारी) करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले, तर तिघे करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवा १ रुग्ण आढळला आणि एकच रुग्ण करोनामुक्त झाला.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ४, खेडमध्ये ११, चिपळूण तालुक्यात ३, तर राजापूरमध्ये १ रुग्ण आढळला. (एकूण १९). रॅपीड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत १ आणि दापोलीत ३ बाधित आढळले. (एकूण ४). (दोन्ही मिळून २३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९८२९ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७७ हजार ४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३२ आहे. त्यातील सर्वाधिक ३२ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात, तर त्याखालोखाल २५ रुग्ण कळंबणी (ता. खेड) येथील उपजिल्हा रुग्णालयात आहेत. ३८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ३ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९३०८ झाली आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आजही कमी असल्याने करोनामुक्तीचा दर घटला असून तो आता ९४.६९ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एका मृत्यूची नोंद झाली. चिपळूण तालुक्यातील ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू काल झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६० झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२० फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवा १ करोनाबाधित आढळला, तर १ करोनामुक्त झाला. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३८७ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६०३४ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply