अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाकडून ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

रत्नागिरी : येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयच्या माजी विद्यार्थी मंडळाने जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. करोनाच्या परिस्थितीमुळे नेहमीच्या नियोजनात तांत्रिक बदल करून ऑनलाइन स्पर्धा घेण्यात येत आहे.

स्पर्धा आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या गटासाठी असून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषणाचे व्हिडीओ तयार करून ते अपलोड करायचे आहेत. व्हिडीओ ४ ते ५ मिनिटांचा अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी करोना संकट आणि माझे शिक्षण, माझ्या जीवनातील लसीकरणाचे महत्त्व असे दोन विषय आहेत. विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३०० आणि २०० रुपयांची रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे तसेच उत्तेजनार्थ दोघांसाठी रोख १०० रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धकाने एकाच विषयाची निवड करावी. वेळेची मर्यादा पाळून व्हिडिओ रेकार्डिंग करावे. प्रत्येक शाळेने निवडक दोनच व्हिडीओ पाठवायाचे आहेत. स्पर्धकाने गणवेश घालूनच भाषण करावे. व्हिडीओ करताना मोबाइल स्थिर ठेवावा. आडवा धरावा. आपले व्हिडीओ २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संदेश रहाटे (9623766593), गणपती एडवी (9420377737) किंवा प्रा. टी. बी. नाईक (9850040980) यापैकी एका व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावेत. व्हिडीओ रेकार्डिंग करताना सुरुवातीला आपले आणि शाळेचे नाव सांगावे. तसेच व्हिडीओसोबत आपले नाव, शाळा, विषय आणि संपर्क क्रमांक पाठवावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सर्व सहभागी स्पर्धकांना ई प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धा फक्त रत्नागिरी जिल्हा मर्यादित आहे, स्पर्धेचे माध्यम मराठी भाषा आहे.

जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, सचिव गणपती एडवी, प्राचार्या सौ. ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले आहे. स्पर्धाप्रमुख म्हणून विनायक हातखंबकर काम पाहत आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply