नागपूर-मडगाव विशेष गाडी २८ मार्चपर्यंत धावणार

रत्नागिरी : नागपूर-मडगाव अशी साप्ताहिक स्पेशल गाडी कोकण रेल्वेमार्गे येत्या २८ मार्चपर्यंत धावणार आहे.

नागपूर-मडगाव मार्गावर धावणारी ही साप्ताहिक विशेष गाडी (०१२३७/३८) नागपूरहून २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ३ वाजून ५० रवाना झाली. ती गाडी येत्या २७ मार्चपर्यंत दर शुक्रवारी याच वेळी नागपूरहून सुटणार आहे, तर शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता ती मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २१ फेब्रुवारी ते २८ मार्च २०२१ कालावधीत दर रविवारी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी, सोमवारी रात्री ८.३० वाजता ती नागपूरला पोहचेल.

ही गाडी १३ वातानुकूलित, १ पेंट्री कार, २ लगेज कम जनरेटर कार अशी एकूण १६ डब्यांची असेल. ही गाडी कोकण रेल्वेमार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी येथे थांबणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply