धर्मशास्त्राचा इतिहास हा पां. वा. काणे यांचा ग्रंथ सर्वसमावेशक

रत्नागिरी : महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचा जगभरात अभ्यासस केला जाणारा धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ सर्वसमावेशक आहे, असे मत त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये व्यक्त करण्यात आले.

महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या स्मारकाचा दापोलीत शुभारंभ

दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या १४२ व्या जयंतीचे औचित्य साधून जालगाव (ता. दापोली) येथे महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीच्या स्मारकाचा काल (दि. ७ मे) प्रारंभ झाला. जालगाव अपना स्वीट्सच्या इमारतीत मुख्य कार्यक्रम झाला.

समाजालाही पुढे नेणाऱ्या ब्राह्मणांनी जमिनीवर राहूनच काम करावे : चित्रा गोस्वामी

रत्नागिरी : आपल्याबरोबर समाजालाही पुढे नेणाऱ्या ब्राह्मणांमधील शक्ती पोटजातींच्या भेदांमुळे विखुरली गेली आहे. बुद्धी, शक्तीचा स्वाभिमान बाळगतानाच ब्राह्मणांनी जमिनीवर राहूनच काम करावे, असे आवाहन साहित्यिक आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष पुरस्कारांची घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे आरोग्यविषयक विविधांगी पुस्तक लेखनाबद्दल डॉ. शरद प्रभुदेसाई, शतकवीर रक्तदाते मोरेश्वर जोशी, बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमोद कोनकर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालिका सीए मुग्धा करंबेळकर यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संघातर्फे देण्यात आली.

साने गुरुजी कथामालेचा नाथ पै युवाशक्ती पुरस्कार यशराज प्रेरणा युवा संघटनेला जाहीर

मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण तालुका शाखेचा बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार मालवण तालुक्यातील आचरे येथील यशराज प्रेरणा या युवा संघटनेला जाहीर झाला आहे.

शिवराय समजावून सांगणारा शाहीर

पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज, १५ नोव्हेंबर २०२१ (कार्तिकी एकादशी) रोजी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. याच वर्षी जुलै महिन्यात त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या आठवणी जागवणारा हा लेख..