रत्नागिरीत २४ तासांत ९६ नवे रुग्ण; चार मृत्यू; मृत्युदर ३.४९ टक्के

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. १२) चौघा करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील तीन, तर चिपळूण तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या ८७ झाली असून, जिल्ह्याचा करोनाचा मृत्युदर ३.४९ टक्के झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९६ नवे बाधित रुग्ण आढळले असून, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २४८७ झाली आहे. बरे झालेल्यांची संख्या १६१६ झाली असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६४.९७ टक्के आहे.

आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून १०, कोव्हिड केअर सेंटर, घरडा येथून ५, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथून २, उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथून २ अशा १९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दाखल झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील असा – रत्नागिरी २५, दापोली १३, कामथे २१, गुहागर २६, देवरूख ५, लांजा १, खाजगी प्रयोगशाळा ५ (चिपळूण १, खेड ४.

आज चार करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील ५३ वर्षीय महिला, शिवाजीनगर, रत्नागिरी येथील ६८ वर्षीय महिला, पूर्णगड, रत्नागिरी येथील ६१ वर्षीय पुरुष आणि खेर्डी, चिपळूण येथील ८६ वर्षीय रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टिव्ह ७८४ पॉझिटिव्ह रुग्ण उपचारांखाली आहेत.

नवी करोनाबाधित क्षेत्रे
आज संभाजीनगर, नाचणे, नवलाईनगर नाचणे, लक्ष्मी नारायणवाडी, कासारवेली, जांभुळ फाटा, मिरजोळे, भाट्ये मोहल्ला, नागलेवाडी, आंबेशेत, कुवारबाव, बौद्धवाडी पोमेंडी बु., निवळी तिठा, करबुडे, मूळगाव, शंखेश्वर मधुबन, माळनाका, शासकीय कर्मचारी वसाहत, आरोग्य मंदिर, जैन कॉलनी, थिबा पॅलेस रोड, सिद्धिविनायक चौक, कोकणनगर, शिवतीर्थ अपार्टमेंट, तेली आळी, बयाबी मंजील, अदमापूर, संजीवनी नगर, गोळप, कारवांचीवाडी, महालक्ष्मी मंदिरासमोर, निसर्ग वसाहत, शांतीनगर, जयगड, सडेवाडी, विनम्रनगर, नाचणे, साईसिद्धी अपार्टमेंट, शिवाजीनगर, आठल्ये कॉम्प्लेक्स, गाडीतळ, गोळप मोहल्ला, रामविठ्ठल कॉम्प्लेक्स, टिळक आळी ही क्षेत्रे करोनाबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात सध्या २०१ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, त्यांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी ३२, दापोली १२, खेड ४२, लांजा ५, चिपळूण ९५, मंडणगड १, राजापूर ८, संगमेश्वर १, गुहागर ५.

सध्या संस्थात्मक विलगीकरणात १५७ रुग्ण आहेत. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातून आलेल्या ४९ हजार ११७ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५३८ झाली असून, त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, १५४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply