रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २९) नव्या ७१ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३७८७ झाली आहे. आज करोनामुळे तिघांच्या मृत्यूची नोंदही झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ११०९ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे – आरटीपीसीआर – रत्नागिरी ७, लांजा ५,
कळंबणी ८. ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी ३७, खासगी हॉस्पिटल १४.
आज बरे झालेले ९४ रुग्ण आपापल्या घरी गेले. त्यात जिल्हा रुग्णालयातील १०, कामथे ११, कळंबणी १, संगमेश्वर १, समाजकल्याण भवन ९, घरडा हॉस्पिटल १०, पोलीस हेडक्वार्टर्स, रत्नागिरी २२, तर महिला रुग्णालयातील ३० जणांचा समावेश आहे. आजपर्यंत २४७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आज जिल्ह्यात तिघांचा मृत्यू नोंदविला गेला. त्याचा तपशील असा – पांगरी, ता. संगमेश्वर – १ रुग्ण, वय ६५, वेरळ, ता. खेड – १ रुग्ण, वय ७५, चिपळूण १ रुग्ण, वय ५२. आजपर्यंत एकूण १३२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ४३, खेड १५, गुहागर ४, दापोली २१, चिपळूण २९, संगमेश्वर १०, लांजा २, राजापूर ७, मंडणगड १.
सध्या विविध रुग्णालयांमध्ये ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असलेले ११८३ रुग्ण आहेत. संस्थात्मक विलगीकरणात एकूण ९५ रुग्ण असून, त्यांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय ४०, उपजिल्हा रुग्णालय, कामथे १६, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी ६, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे ५, कोव्हिड केअर सेंटर केकेव्ही, दापोली २०, गुहागर ५, उपजिल्हा रुग्णालय, दापोली २, पाचल १. होम क्वारंटाइनमध्ये सात हजार २९५ जण आहेत.
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण २७ हजार ३२४ नमुने तपासण्यात आले. त्यात ३७८७ नमुने पॉझिटिव्ह, तर २३ हजार ५२५ निगेटिव्ह आले. आता प्रयोगशाळेत एकही नमुना तपासणीसाठी प्रलंबित नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २२ नवे करोनाबाधित सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ११०९ झाली आहे. जिल्ह्यातील ६२६ जणांनी करोनावर मात केली असून, ४६४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत सिंधुदुर्गातील १९ जणांचा बळी करोनाने घेतला आहे. जिल्ह्यात सध्या ११ हजार ५१५ व्यक्ती विलगीकरणात असून, जिल्ह्यात सध्या १७० कंटेन्मेंट झोन आहेत.
