रत्नागिरीत एकाच दिवशी करोनामुळे सहा मृत्यू; सिंधुदुर्गात १५ नवे रुग्ण आढळले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१९ सप्टेंबर) करोनाच्या आणखी सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २०९ झाली आहे. सिंधुदुर्गात १५ नवे रुग्ण सापडले आहेत.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६९ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यातील ४२ रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६६०५ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – खेड ६, रत्नागिरी २३, राजापूर १, संगमेश्वर ३ (एकूण ३३). रॅपीड अँटिजेन टेस्ट – लांजा १, राजापूर १, गुहागर ५, खेड ७, चिपळूण ३, रत्नागिरी १९. (एकूण ३६).

जिल्ह्यातील करोनाचा मृत्युदर ३.०१ असा आहे. आज मरण पावलेले ४ जण खेडमधील, तर दापोली आणि रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येकी एक जण आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१९ सप्टेंबर) आणखी १५ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २९३८ झाली आहे. आतापर्यंत १७६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १११९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप १०२९ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५८ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८३३५ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ७३१ व्यक्ती आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply