करोनाचे रत्नागिरीत ९४ नवे रुग्ण; सिंधुदुर्गात रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० सप्टेंबर) ९४ नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६६९९ झाली आहे. सिंधुदुर्गात ९९ नवे रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – मंडणगड २, खेड ३, गुहागर १०, चिपळूण १४, संगमेश्वर १३, रत्नागिरी १२, लांजा १, राजापूर ५. (एकूण ६०). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली २, गुहागर ३, रत्नागिरी २१, लांजा ४. (एकूण ३४).

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाच्या आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये तीन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २१७ झाली आहे. जिल्ह्यातील करोनाचा मृत्युदर ३.२ असा आहे.

आज मरण पावलेल्यांचा तालुकानिहाय तपशील असा – चिपळूण, वय ३२, पुरुष. खेड वय ६०, पुरुष. संगमेश्वर वय ८४, महिला. वय ८७, महिला. गुहागर वय ५०, महिला. रत्नागिरी वय ६३, पुरुष. खेड वय ७१, पुरुष. चिपळूण वय ७८, महिला.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२० सप्टेंबर) आणखी ९९ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३०३७ झाली आहे. आतापर्यंत १९०० जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ९५० अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८२५२ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात ४५८४ व्यक्ती आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply