रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज (२४ सप्टेंबर) २० जणांची घट झाली. काल ७१ रुग्ण आढळले होते. आज नव्या ५१ करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६९५४ झाली आहे. सिंधुदुर्गात आज ९८ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३३९६ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या (२४ सप्टेंबर) रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – चिपळूण २, संगमेश्वर १, रत्नागिरी ९, राजापूर ७. (एकूण १९). रॅपीड अँटिजेन टेस्ट – खेड – १, गुहागर ११, चिपळूण ५, रत्नागिरी ९, लांजा ६. (एकूण ३२).

आज लागोपाठ दुसऱ्या दिवशीही सहा रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यापैकी दोघांचा मृत्यू खासगी रुग्णालयांत, तर चौघांचा शासकीय रुग्णालयात झाला. आजचे सहा रुग्ण पुरुष आहेत. त्यापैकी चौघांचा मृत्यू काल, तर दोघांचा आज झाला. जिल्ह्यात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या २३७ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.४ टक्के आहे. आजच्या मृतांचा तपशील असा – संगमेश्वर वय ७०, खेड वय ७० आणि ५९, चिपळूण वय ७५ आणि ८०, रत्नागिरी ६६. मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – रत्नागिरी – ६९, खेड – ४१, गुहागर – ८, दापोली – २६, चिपळूण – ५५, संगमेश्वर – २२, लांजा – ६, राजापूर – ८, मंडणगड – २ (एकूण २३७).

दरम्यान, आज आणखी १६३ जणांनी करोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ५३३८ झाली असून, ही टक्केवारी ७६.७६ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२४ सप्टेंबर) आणखी ९८ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३३९६ झाली आहे. आतापर्यंत २२२१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता एकही अहवाल प्रलंबित नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील ६९ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ४९१८ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ८७९ व्यक्ती आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply