रत्नागिरीत ६६, सिंधुदुर्गात ५८ नवे रुग्ण; रत्नागिरीत करोनामुक्तीचे प्रमाण ८७.३१ टक्के

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (सात ऑक्टोबर) करोनाचे नवे ६६ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ७८३५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५८ नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४२२२ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तीचे प्रमाण ८७.३१ टक्के झाले आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज बरे झालेल्या ४१ करोनाबाधितांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ६८४१ झाली आहे. करोनामुक्तीचे हे प्रमाण ८७.३१ टक्के आहे.

आज करोनाचे नवे ६६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७८३५ झाली आहे. आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – दापोली २, खेड १, गुहागर ६, चिपळूण ११, संगमेश्वर २, रत्नागिरी ११, लांजा १, राजापूर ६ (एकूण ४०). रॅपीड अँटिजेन टेस्ट – मंडणगड १, गुहागर १, चिपळूण १३, रत्नागिरी १०, लांजा १ (एकूण २६).

आज करोनाच्या तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी एक रुग्ण २ सप्टेंबरला, तर दोघे काल मरण पावले. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता २८५ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६ टक्के झाला आहे. आतापर्यंतच्या तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७७, खेड ४७, गुहागर १०, दापोली ३१, चिपळूण ६९, संगमेश्वर २७, लांजा १०, राजापूर १२, मंडणगड २ (एकूण २८५).

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (सात ऑक्टोबर) आणखी ५८ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४२२२ झाली आहे. आतापर्यंत ३२३७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १०४ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply