रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (नऊ ऑक्टोबर) करोनाचे नवे ५६ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ७९२९ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४२९९ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज ५६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर आज ८८ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.
जिल्ह्यात आज आढळलेल्या ५६ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७९२९ झाली आहे. आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – राजापूर ६, लांजा २, चिपळूण ५, रत्नागिरी १४, दापोली १ (एकूण २८). रॅपीड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी १०, चिपळूण ३, खेड ७, दापोली ३, गुहागर ४, मंडणगड १ (एकूण २८).
आज ८८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७०३८ झाली आहे. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ८८.७६ आहे. आज रत्नागिरीतील ५९ वर्षीय एका करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण करोनाबळींची संख्या २९१ झाली असून मृतांची टक्केवारी ३.६७ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (नऊ ऑक्टोबर) आणखी ३१ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४२९९ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १११ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.