रत्नागिरी : रत्नागिरीतील बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फे २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२० या १० दिवसांच्या कालावधीत फास्ट फूड विषयाचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात, दाबेली, पाव भाजी, गोबी मन्चुरिअन, रगडा कोन, भेळ, शेव-बटाटा-पुरी, उत्तप्पा, डोसा, मेदू वडा, सँडविच, व्हेज फ्राइड राइस, व्हेज सूप, केकचे विविध प्रकार, चॉकलेटचे विविध प्रकार, नानकटाई इत्यादी प्रकार प्रात्यक्षिकासह शिकविले जाणार आहेत. हे प्रशिक्षण मोफत असून चहा, नाष्टा, जेवण व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी येत्या २२ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येईल.
प्रशिक्षणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती किंवा उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य अर्ज करू शकतात. प्रशिक्षणासाठी २० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येणार आहे. व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्राधान्य असेल. अर्ज भरण्यासाठी येताना एक फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, उमेद पुरस्कृत बचत गटातील महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्यास उमेद अभियानामार्फत देण्यात येणारे शिफारसपत्र, दारिद्र्यरेषेखाली नाव असल्यास तसा दाखला कार्यालयीन वेळेत घेऊन यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८३४०१५५२२ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधता येईल.
प्रशिक्षणाचे ठिकाण आणि कार्यालयाचा पत्ता असा : स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, अष्टविनायक सोसायटीच्या बाजूला, साईनगर, आरटीओ रोड, कुवारबाव, रत्नागिरी.

