रत्नागिरीत ४४, तर सिंधुदुर्गात ४३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१० ऑक्टोबर) करोनाचे नवे ४४ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ७९७३ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३ नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४३४२ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांची संख्या कालपेक्षा आज आणखी घटली आहे. आज नवे ४४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. आज ३३ रुग्ण बरे झाल्याने घरी जाऊ शकले. आज एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्ह्यात आज आढळलेल्या ४४ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७९७३ झाली आहे. आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ११, देवरूख १, गुहागर १, लांजा ३, मंडणगड २, कामथे ३ (एकूण २१), रॅपीड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी ९, गुहागर ३, कळंबणी ५, कामथे ५, दापोली १ (एकूण २३).

आज ३३ रुग्ण करोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७०७१ झाली असून ही टक्केवारी ८८.६८ आहे. आज खेडमध्ये शासकीय रुग्णालयातील ७२ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण करोनाबळींची संख्या २९२ झाली असून, मृतांची टक्केवारी ३.६६ टक्के आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत रत्नागिरीत सर्वाधिक ७९, तर त्याखालोखाल चिपळूणमध्ये ६९ रुग्णांचा मृत्यू झाला. इतर तालुक्यांची आकडेवारी अशी – खेड ४९, गुहागर ११, दापोली ३१, संगमेश्वर २९, लांजा १०, राजापूर १२, मंडणगड २.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१० ऑक्टोबर) आणखी ४३ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४३४२ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १११ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. आजपर्यंत ३४०० जण करोनावर मात करून घरी गेले आहेत.

मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – सावंतवाडी २९, कणकवली २५, कुडाळ १९, मालवण ११, वेंगुर्ला ९, वैभववाडी ८, देवगड ७, दोडामार्ग २ आणि जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply