रत्नागिरीत करोना रुग्णवाढीचा वेग घटला; एकूण बाधितांची संख्या आठ हजारांवर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ ऑक्टोबर) करोनाचे नवे ३१ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ८००४ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७ नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४३९९ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज ३१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर आज ४६ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्ह्यात आज आढळलेल्या ३१ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ८००४ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – राजापूर ३, चिपळूण ९, रत्नागिरी ५ (एकूण १७). रॅपीड अँटिजेन टेस्ट – दापोली २, खेड ३, गुहागर २, चिपळूण ४, रत्नागिरी ३ (एकूण १४). (दोन्ही मिळून ३१)

आज ४६ रुग्ण करोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७११७ झाली आहे. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ८८.९१ आहे.

१५ सप्टेंबर रोजी झालेल्या संगमेश्वरमधील एका ६० वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद आज झाली. हा मृत्यू सरकारी रुग्णालयात झाला होता. जिल्ह्यातील एकूण करोनाबळींची संख्या २९३ झाली असून मृतांची टक्केवारी ३.६६ आहे.

तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७९, खेड ४९, गुहागर ११, दापोली ३१, चिपळूण ६९, संगमेश्वर ३०, लांजा १०, राजापूर १२, मंडणगड २ (एकूण २९३)
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (११ ऑक्टोबर) आणखी ५७ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४३९९ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ११२ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. आजपर्यंत ३५०७ जण करोनावर मात करून घरी गेले आहेत.

मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – सावंतवाडी २९, कणकवली २५, कुडाळ २०, मालवण ११, वेंगुर्ला ९, वैभववाडी ८, देवगड ७, दोडामार्ग २ आणि जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply