रत्नागिरीत २२, तर सिंधुदुर्गात १९ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज नव्या २२ रुग्णांची नोंद आज (१५ ऑक्टोबर) झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८१६६ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १९ रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४४९० झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (१५ ऑक्टोबर) २३ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७२९७ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ८९.३५ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे २२ रुग्ण आढळले. त्यापैकी १० आरटीपीसीआर चाचणीनुसार, तर जण रॅपिड अँटिजेन टेस्टनंतर १२ जण करोनाबाधित असल्याचे नक्की झाले. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – खेड १, गुहागर १, चिपळूण ३, रत्नागिरी ५ (एकूण १०). रॅपिड अँटिजेन टेस्ट – खेड १, चिपळूण ८, रत्नागिरी ३ (एकूण १२) (दोन्ही मिळून २२)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८१६६ झाली आहे. बाधितांचा दर १५.४९ टक्के आहे. सध्या ४२२ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. हे दोन्ही मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ८९ वर्षांचा पुरुष आणि संगमेश्वर तालुक्यातील ७२ वर्षांचा पुरुष यांचा १४ ऑक्टोबरला मृत्यू झाला. त्यांची आज नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता ३०० झाली असून, जिल्ह्याचा मृत्यूदर ३.६७ टक्के आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८१, खेड ४९, गुहागर ११, दापोली ३२, चिपळूण ७१, संगमेश्वर ३२, लांजा १०, राजापूर १२, मंडणगड २.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ ऑक्टोबर) आणखी १९ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४४९० झाली आहे. आतापर्यंत ३७४६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज मालवण तालुक्यातील चौके येथील ६० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११६ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या : देवगड ८, दोडामार्ग २, कणकवली २९, कुडाळ २०, मालवण १२, सावंतवाडी २८, वैभववाडी ७, वेंगुर्ला ९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

Fest Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply