रत्नागिरीत १३, तर सिंधुदुर्गात ४० नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ ऑक्टोबर) १३ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४१८ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४० नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४८२५ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ ऑक्टोबर) ३७ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७७९८ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९२.६३ टक्के आहे.

जिल्ह्यात आज नवे १३ रुग्ण आढळले आहेत. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – दापोली १, गुहागर १ (एकूण २). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली ४, गुहागर ३, चिपळूण १, लांजा ३ (एकूण ११) (दोन्ही मिळून १३)

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८४१८ झाली आहे. बाधितांचा दर १४.८१ टक्के आहे. सध्या २०५ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तिघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तिन्ही मृत्यू सरकारी रुग्णालयात झाले असून, तिघांचेही मृत्यू २८ ऑक्टोबर रोजी झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ७५ वर्षांचा पुरुष आणि ९५ वर्षांची महिला, तसेच संगमेश्वर तालुक्यातील ६५ वर्षांच्या पुरुषाचा यात समावेश आहे. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या ३१६ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.७५ टक्के झाला आहे.

मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८७, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७४, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२८ ऑक्टोबर) ४० व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४८२५ झाली आहे. आज २२ जण करोनामुक्त झाले असून, आतापर्यंत ४१७६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२६ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply