करोनाचे रत्नागिरीत तीन, तर सिंधुदुर्गात दोन नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२३ नोव्हेंबर) तीन नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १४ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज दोन नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२३ नोव्हेंबर) करोनाचे नवे तीन रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८६६६ झाली आहे. बाधितांचा दर १४.०२ टक्के आहे. आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – संगमेश्वर १, लांजा १ (एकूण २). रॅपिड अँटिजेन टेस्ट – लांजा १ (एकूण १). (दोन्ही मिळून ३).

जिल्ह्यात आज १४ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८२०० झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.६२ टक्के आहे. सध्या ७८ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी १० जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ३१९ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.६८ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ नोव्हेंबर) दोन नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५१७० झाली आहे. सध्या १७५ जण उपचारांखाली आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनामुक्तांची संख्या ४८५० आहे. सावंतवाडी येथील ६७ वर्षीय पुरुषाचा आज करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १३९ जणांची करोनाविरुद्धची लढाई दुर्दैवाने अयशस्वी ठरली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply