मंडणगड-तिडे-ठाणे-नालासोपारा एसटी बससेवा सुरू

मंडणगड : तिडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मागणीवरून मंडणगड-तिडे-ठाणे-नालासोपारा अशी एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे.

ही बस मंडणगड येथून सायंकाळी सव्वाचार वाजता सुटून रात्री १२ वाजता नालासोपाऱ्याला पोहोचणार आहे. केळवत, कुंबळे, तिडे, तळेघर, सडे, आतखोल, शेनाळे, महाप्रळ, चिंबाव, तुडील, महाड, माणगाव, कोलाड, नागोठणे, वडखल, रामवाडी, पनवेल, कोकणभवन, नेरूळ, कळवा, ठाणे, घोडबंदर, वसई फाटा येथे या गाडीचे थांबे आहेत. परतीच्या प्रवासाकरिता ही बस नालासोपारा येथून पहाटे सव्वापाच वाजता सुटणार आहे.

या बसची संगणकीय आरक्षणसेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग नियंत्रक सुनील भोगरे, विभागीय वाहतूक अधिकारी सचिन सुर्वे, अनंत जाधव, मंडणगड आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे, वाहन परीक्षक श्री. भिसे, ग्रुप ग्रामपंचायत तिडे-तळेघरचे सरपंच सुरेश बैकर, उपसरपंच दादा पांढरे, मोहल्ला अध्यक्ष बासीर खलफे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर वेलेले, शौकत तांबे, मकबुल तांबे, फुरकान वेलेले, बासीर खलफे, दत्ताराम महाप्रळकर, दया मामा, मुकतार धनसे, सादिक वेलेले, रूपेश महाप्रळकर, संतोष खैरे, शांताराम निमदे, लियाकत चिकलकर, रियाझ जोगिलकर, सिराज जोगिलकर, अयुब जोगिलकर, अब्दुला खलफे, अब्दुल कादिर खलफे, हसन खलफे, अजिझ जोगिलकर, बासिद, ईकमान चिकलकर, दत्ता मुरुडकर, बबन देवघरकर, संदेश करावडे, जफार वेलेले, सचिन महाप्रळकर, सागर तांबुटकर, बादशाह चिकलकर, महोमद मांडलेकर, सोहेब खलफे, कोकण एसटीप्रेमी ग्रुपचे अध्यक्ष अपेक्षित कुळये, उपाध्यक्ष विकास गुरव, संवाद कार्यकारिणी संघ-पुणे व ‘पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती कल्याण’चे संपर्कप्रमुख वैभव बहुतुले, मंडणगड आगाराचे चालक श्री. शिरसाट, वाहक श्री. पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply