Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत १९, तर सिंधुदुर्गात २० नवे करोनाबाधित

Photo by Markus Spiske on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ जानेवारी) करोनाचे नवे १९ रुग्ण आढळले, तर ३ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २० नवे रुग्ण आढळले, तर ७ रुग्ण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत आज प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी एक, संगमेश्वर तालुक्यात पाच, लांजा तालुक्यात दोन, तर राजापूर तालुक्यात चार नवे बाधित रुग्ण आढळले. (एकूण १३) रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी एक, तर लांजा तालुक्यात तीन नवे बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून १९) जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९४८९ झाली आहे. आज आणखी १३५४ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६८ हजार ४८१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८९ आहे. त्यातील सर्वाधिक ३२ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर २२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज ३ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९०३४ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.२० टक्के झाला आहे. आज जिल्ह्यात एका मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांची संख्या ३४६ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६४ टक्के आहे. चिपळूण तालुक्यातील ६६ वर्षांच्या पुरुषाचा आज खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२६ जानेवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, २० नवे करोनाबाधित आढळले, तर ७ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६१८६ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५७९३ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वागदे (ता. कणकवली) येथील ६५ वर्षीय पुरुषाचा आज करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६५ झाली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version