रत्नागिरीत २०, तर सिंधुदुर्गात २२ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ जानेवारी) करोनाचे नवे २० रुग्ण आढळले, तर १० जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २२ नवे रुग्ण आढळले, तर २५ रुग्ण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात, दोन चिपळूण तालुक्यात तीन, संगमेश्वर तालुक्यात नऊ, तर खेड आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी एक असे १६ नवे बाधित रुग्ण सापडले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात एक, तर संगमेश्वर तालुक्यात तीन नवे बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून २०) जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९५१३ झाली आहे. आज आणखी ७७३ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७० हजार ३१८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८९ आहे. त्यातील सर्वाधिक ३५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर २८ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज १० जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९०५९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.२३ टक्के झाला आहे. मृतांची एकूण संख्या ३४७ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२८ जानेवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, २२ नवे करोनाबाधित आढळले, तर २५ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६२०८ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५८२५ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६५ आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply