ऊर्मी ग्रुपचा ३१ जानेवारीला एक उनाड दिवस

रत्नागिरी : गेल्या मार्च महिन्यापासून करोनाच्या दुष्टचक्रात अडकून पडलेल्या महिलांना नवी ऊर्मी मिळावी, यासाठी येथील ऊर्मी ग्रुपतर्फे ‘एक उनाड दिवस निसर्गाच्या सान्निध्यात’ हा उपक्रम येत्या रविवारी (ता. ३१ जानेवारी) राबवण्यात येणार आहे. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या साह्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऊर्मी ग्रुपतर्फे संगमेश्वर तालुक्यातील सप्तेश्वर येथे व्हॅली क्रॉसिंग आणि तत्सम उपक्रम घेतले जाणार आहेत. त्यामध्ये महिला आपल्यासोबत १२ वर्षांवरील पाल्यालाही सहभागी करून घेऊ शकणार आहेत. यावेळी गिर्यारोहणाची शास्त्रशुद्ध माहिती ‘रत्नदुर्ग’तर्फे दिली जाणार आहे.

‘ऊर्मी’तर्फे याआधीही महिलांकरिता विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने लांजा तालुक्यातील दुर्गम अशा माचाळ येथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कॉलेज तरुणींपासून ६० वर्षीय ज्येष्ठ महिलांनीही सहभाग घेतला होता. ऊर्मीतर्फे महिलांकरिता हा पहिला ट्रेक होता. यावेळी मुचकुंद ऋषींची गुहा पाहण्याची संधी महिलांना मिळाली होती.

येत्या रविवारच्या सप्तेश्वर व्हॅली क्रॉसिंग उपक्रमात सहभाग नोंदविण्याकरिता आदिती पटवर्धन (9403508088), कल्याणी पटवर्धन (7720800032) किंवा कीर्ती पटवर्धन (9881236600) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘ऊर्मी’ ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply