Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीत तीन, सिंधुदुर्गात चार नवे करोनाबाधित, ३१ जण करोनामुक्त

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (८ फेब्रुवारी) करोनाचे नवे ३ रुग्ण आढळले, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे चार रुग्ण आढळले. दोन्ही जिल्ह्यांत मिळूऩ एकूण ३१ रुग्ण आज करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार चिपळूण तालुक्यात एक, रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात दोन नवे बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून ३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९६४२ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७३ हजार ९११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९७ आहे. त्यातील सर्वाधिक ३० रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ३२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १० जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९१८० झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.२० टक्के झाला आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ३५१ एवढीच असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६४ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, ४ नवे करोनाबाधित आढळले, तर २१ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३०६ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५९६१ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १६८ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version