रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी सात नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (चार फेब्रुवारी) करोनाचे नवे सात रुग्ण आढळले, तर १७ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवे सात रुग्ण आढळले, तर १ रुग्ण करोनामुक्त झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज (चार फेब्रुवारी) आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर तालुक्यात प्रत्येकी एक नवा बाधित रुग्ण सापडला. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात दोन नवे बाधित रुग्ण आढळले. तसेच, दापोली आणि मंडणगड तालुक्यात प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला. (दोन्ही मिळून ७) जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९६०६ झाली आहे. आज आणखी २६४ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७३ हजार २३५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १११ आहे. त्यातील सर्वाधिक २८ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ५५ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज १७ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९१२६ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.०० टक्के झाला आहे. जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ३५१ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (४ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, ७ नवे करोनाबाधित आढळले, तर १ जण करोनामुक्त झाला. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६२७६ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५९०८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कळसुली (ता. कणकवली) येथील ५१ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १६८ झाली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply