१० रुपयांत आरोग्य तपासणी, मोफत जेनेरिक औषधे; नाचणे गावातील युवकांचा उपक्रम

रत्नागिरी : करोनाच्या कालावधीत सुदृढ आरोग्याचे महत्त्व प्रत्येकाला कळले. तसेच आरोग्य यंत्रणेच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी शहराजवळच्या नाचणे गावातील काही तरुणांनी सर्वसामान्य, गरजू नागरिकांसाठी केवळ १० रुपयांत आरोग्य तपासणीचा उपक्रम ‘आपली माणसं’ या नावाने सुरू केला आहे. गावातील कोणीही गरीब व्यक्ती आरोग्य तपासणीपासून, उपचारांपासून वंचित राहू नये, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्यात दर्जेदार जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

तीन फेब्रुवारीला आरोग्य तपासणी शिबिराच्या रूपाने या उपक्रमाचा शुभारंभ झाला. गावातील हरहुन्नरी आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे सुनील सुपल आणि राजेश नार्वेकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन झाले. ‘आपली माणसं’चे वैद्य अभय धुळप व डॉक्टर योगेश खेडेकर यांनी तपासणी केली. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आपली माणसं’चे गौरांग आगाशे, अमोल सावंत, नंदकिशोर चव्हाण, अभिजित गिरकर, योगेश ठुकरूल, हर्ष दुडे, प्रथमेश लाखण असे सर्व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

असे आरोग्य तपासणी शिबिर दर बुधवारी सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत होणार आहे. गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन ‘आपली माणसं’तर्फे करण्यात आलं आहे.

नोंदणीसाठी क्रमांक : ७०८३८ ८३३९९
शिबिराचे स्थळ : ओम राधा अपार्टमेंट, साळवी स्टॉप, रत्नागिरी
वेळ : दर बुधवारी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply