सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली करोना प्रतिबंधक लस

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हावासीयांनी कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता करोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. आज (चार फेब्रुवारी) के. मंजुलक्ष्मी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी करोनाची लस घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.

‘प्रत्येकाने कोविडची लस घ्यावी, आपल्या कुटुंबीयांनाही लस द्यावी. कोणीही मागे राहू नये. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के लसीकरण झाले आहे. उर्वरित लाभार्थींनीही स्वतः पुढाकार घेऊन लस घ्यावी,’ असे आवाहनही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी या वेळी केले.

‘सर्वांनी लवकरात लवकर लस घेऊन सहकार्य करावे, सर्व सहकारी व नातेवाईक यांना याविषयी आश्वस्त करावे व लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे,’ असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply