Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाचशेहून अधिक करोनाबाधित, दहा जणांचा मृत्यू

Photo by Markus Spiske on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांनी आज (१७ एप्रिल) सलग दुसऱ्या दिवशी पाचशेची संख्या ओलांडली. आज ५१५ करोनाबाधित आढळले, तर १६७ रुग्ण करोनामुक्त झाले. आज दहा जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

आजही सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक १७९ रुग्ण चिपळूण तालुक्यात तालुक्यात होते.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ३७, दापोली ९, खेड ५०, गुहागर ११, चिपळूण १६७, संगमेश्वर ६, लांजा ८, राजापूर २०. (एकूण ३०८). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ७७, दापोली ७, खेड ३०, गुहागर २५, चिपळूण १२, संगमेश्वर ३५, मंडणगड २, लांजा १२ आणि राजापूर ७. (एकूण २०७) (दोन्ही मिळून ५१२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १५ हजार ७५ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार ६२ आहे. त्यातील सर्वाधिक १३९ रुग्ण रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल असून एक हजार १४६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १६७ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या ११ हजार ६५५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज आणखी कमी झाला असून तो ७७.३१ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी एक हजार १५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात कालच्या सहा आणि आजच्या चार रुग्णाचा समावेश आहे. सर्व दहा जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत झाला. मृतांचा तपशील असा –
१६ एप्रिल – संगमेश्वर, पुरुष (वय ८३), लांजा, महिला (२८), रत्नागिरी, पुरुष (७४), राजापूर, महिला (८०), खेड, पुरुष (६५), खेड, पुरुष (६८). १७ एप्रिल – संगमेश्वर, महिला (७८), राजापूर, महिला (८३), रत्नागिरी, पुरुष (७५), गुहागर, पुरुष (७४ वर्षे). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४३९ असून मृत्युदर २.९१ टक्के आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version