रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत घट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ एप्रिल) नव्या करोनाबाधितांच्या संख्येत घट झाली. आज नवे ३९२ रुग्ण आढळले. आज ८८ जण करोनामुक्त झाले, तर १८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी मंडणगड तालुक्यात एकही करोनाबाधित आढळला नाही. इतर तालुक्यांमध्ये सर्वाधिक १३८ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.

जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ७८, दापोली ५७, खेड १६, चिपळूण ५२, संगमेश्वर २९, लांजा ९, राजापूर १३. (एकूण २५४). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ६०, दापोली २०, खेड ३, गुहागर १० आणि चिपळूण ४५. (एकूण १३८). (दोन्ही मिळून ३९२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १९ हजार ६१६ झाली आहे.

जिल्ह्यात आज ८८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १३ हजार १६४ झाली आहे. करोनामुक्तीचा दर कमी झाला असून तो ६७.१० टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी एक हजार ७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण एक लाख २२ हजार २७२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे ३ आणि आजचे १५ अशा एकूण १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ५९४ झाली असून मृत्युदर ३.०२ टक्के आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण मृत्यू असे – रत्नागिरी १४७, खेड ७८, गुहागर २३, दापोली ६२, चिपळूण १२४, संगमेश्वर ८७, लांजा २९, राजापूर ३८, मंडणगड ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply