रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ एप्रिल) सलग तिसऱ्या दिवशी पाचशेहून अधिक म्हणजे ५५५ करोनाबाधित आढळले. आज सलग दुसऱ्या दिवशी दहा जणांचा मृत्यू नोंदविला गेला.
आजही सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक १६० रुग्ण रत्नागिरी तालुक्यात होते.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ११०, दापोली १५, खेड ५२, गुहागर ४३, चिपळूण ८६, संगमेश्वर १६, मंडणगड आणि लांजा प्रत्येकी ४ राजापूर १८. (एकूण ३४८). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ५०, दापोली ११, खेड २०, गुहागर ९, चिपळूण ४५, संगमेश्वर ४५, मंडणगड ५, लांजा २० आणि राजापूर २. (एकूण २०७) (दोन्ही मिळून ५५५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १५ हजार ६३० झाली आहे.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार १४५ आहे. त्यातील सर्वाधिक १४५ रुग्ण रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात, तर त्याखालोखाल १३२ रुग्ण महिला रुग्णालयात दाखल आहेत. एक हजार १२४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज २५५ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या ११ हजार ९१० झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज आणखी कमी झाला असून तो ७६.१९ टक्के झाला आहे.
आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी एक हजार ५१४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एक लाख १४ हजार ५६ जणांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी दहा जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी ठरल्याची नोंद झाली. त्यात १६ ते १८ एप्रिल या कालावधीत मरण पावलेल्यांचा समावेश आहे. त्यापैकी एका मृत्यू खासगी रुग्णालयात, तर इतर ९ जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत झाला. मृतांचा तपशील असा –
रत्नागिरी, पुरुष (वय ६९, १७ एप्रिल), चिपळूण, महिला ६५, १७ एप्रिल), राजापूर, पुरुष (७०, १८ एप्रिल), दापोली, महिला (७०, १७ एप्रिल), दापोली, पुरुष (५६, १७ एप्रिल), संगमेश्वर, महिला (६५, १७ एप्रिल), खेड, पुरुष (७०, १६ एप्रिल), चिपळूण, पुरुष (५२, १६ एप्रिल), संगमेश्वर, महिला (४८, १७ एप्रिल), संगमेश्वर, पुरुष (५२, १७ एप्रिल). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४४९ असून मृत्युदर २.८७ टक्के आहे.

