सिंधुदुर्गात करोनाचे नवे ३४१ रुग्ण, सहा जणांचा मृत्यू, सोमवारपासून संचारबंदी कडक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१८ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे ३४१ रुग्ण आढळले, तर १७७ जण करोनामुक्त झाले. आज सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात सोमवार, १९ एप्रिलपासून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

आजच्या ३४१ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ९ हजार ९०७ झाली आहे. या रुग्णांचा आजपर्यंतचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ९५७, दोडामार्ग – ५२८, कणकवली – २६७०, कुडाळ – २०५६, मालवण – ९९५, सावंतवाडी – १२९७, वैभववाडी – ५४९, वेंगुर्ले ७९९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५६.

आज १७७ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७ हजार २७६ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ४०९ आहे.
सर्वाधिक ४३९ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३४२, दोडामार्ग १४०, कुडाळ ४०३, मालवण ३०२, सावंतवाडी २९३, वैभववाडी ३०६, वेंगुर्ले १६०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २४.
सक्रिय रुग्णांपैकी ८८ रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. यापैकी ७० रुग्ण ऑक्सिजनवर तर १८ रुग्ण व्हेंटिलेटर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यांचा तपशील असा – १) मु. पो. पोईप, ता. मालवण, ६५ वर्षीय महिला (तिला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा आजार होता. २) मु. पो. उंबर्डे, ता. वैभववाडी येथील ७८ वर्षीय महिला. तिला उच्च रक्तदाबाचा आजार होता. ३) मु. पो. डिगशी, ता. वैभववाडी येथील ६७ वर्षीय पुरुष. त्याला उच्च रक्तदाबाचा आजार होता. ४) मु. पो. विजयदुर्ग, ता. देवगड येथील ७० वर्षीय महिला. तिला उच्च रक्तदाबाचा आजार होता. ५) मु. पो. नाधवडे, ता. वैभववाडी येथील ६५ वर्षीय पुरुष. त्याला उच्च रक्तदाबाचा आजार होता. ६) मु. पो. ता. कणकवली येथील ७९ वर्षीय पुरुष. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा आजार होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारपासून संचारबंदी कडक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार, १९ एप्रिलपासून संचारबंदी अधिक कडक करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पालकमंत्र्यांनी आज सकाळी जिल्ह्यातल्या करोनाप्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणाबाबत आढावा, तसेच करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांसंदर्भात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. जिल्ह्यात आवश्यकता भासल्यास तालुका ठिकाणची खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात येतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. कुडाळमधील महिला रुग्णालयात एक हजार लिटरचा आणि कणकवली आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी ५०० लिटरचा ऑक्सिजन प्लँट उभारण्याचे निश्चित करण्यात आल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात उद्यापासून आठही तालुक्यात बाहेर फिरणाऱ्यांची जलद अँटिजेन तसेच आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास आरोग्य विभागाच्या मदतीकरिता शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांसाठी आता अँटिजेन तसेच आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. रुग्णवाहिका तात्काळ लागल्या, तर त्या भाडेतत्त्वावर घेण्याच्या सूचनादेखील पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. नगरपालिका आणि नगर पंचायत सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात येणार असून नगरपालिकेसाठी ५ लाख तर नगर पंचायतीची ३ लाखाचा निधी देण्यात येणार आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर आता अँटिजेन तसेच आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply