Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ५३३ रुग्ण

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१८ जून) करोनाचे नवे ५३३ रुग्ण आढळले. त्यामध्ये यापूर्वी नोंद न झालेल्या जुन्या ९३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार २३५, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २०५ (दोन्ही मिळून ४४०). आधीच्या तारखेनुसार ९३ रुग्णांची आज नोंद झाली. त्यांच्यासह आजच्या रुग्णांची संख्या ५३३ झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४७ हजार ६३ झाली आहे. आज झालेल्या चाचण्यांच्या तुलनेने जिल्ह्यातील रुग्णवाढीचा आजचा दर ८.६८ टक्के आहे. हा दर केवळ आजच्या आकडेवारीवर आधारित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६.६४ टक्के आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून पाच हजार ३९६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज चार हजार ६२८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ३५ हजार ७४० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४०१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ४० हजार ६० झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८५.११ टक्के आहे.

जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातील कालच्या २५ आणि आजच्या ८ अशा ३३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ६०७ झाली आहे. मृत्युदर ३.४१ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४८१, खेड १५७, गुहागर १३८, दापोली १२८, चिपळूण ३०६, संगमेश्वर १८६, लांजा ८४, राजापूर ११४, मंडणगड १३. (एकूण १६०७).

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version