रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० जून) करोनाचे नवे उच्चांकी ७६२ रुग्ण आढळले. त्यामध्ये यापूर्वी नोंद न झालेल्या जुन्या ३०५ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार २४१, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २१६ (दोन्ही मिळून ४५७). आधीच्या तारखेनुसार ३०५ रुग्णांची आज नोंद झाली. त्यांच्यासह आजच्या रुग्णांची संख्या ७६२ झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४८ हजार २१३ झाली आहे. आज झालेल्या चाचण्यांच्या तुलनेने जिल्ह्यातील रुग्णवाढीचा आजचा दर कालच्या तुलनेत दुप्पट म्हणजे ९.५४ टक्के आहे. (काल हा दर ४.६५ टक्के होता.) आजचा दर केवळ आजच्या आकडेवारीवर आधारित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६.१९ टक्के आहे.
आज पाच हजार ७८२ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज चार हजार ७९२ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ४९ हजार ४४३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ४०२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ४० हजार ७९२ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८४.६० टक्के आहे.
जिल्ह्यात कालच्या ५ आणि आजच्या ११ अशा १६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ६३९ झाली आहे. मृत्युदर ३.३९ टक्के आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४८८, खेड १६२, गुहागर १३९, दापोली १३२, चिपळूण ३०८, संगमेश्वर १८८, लांजा ९१, राजापूर ११८, मंडणगड १३. (एकूण १६३९).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
