सिंधुदुर्गात नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांच्या संख्येत वाढ

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाच्या नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. आज २० जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ३६३ तर एकूण ३० हजार ५२८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ९८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याबाहेर तपासणी केलेल्या तिघांसह ३३३ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३८, दोडामार्ग – ८, कणकवली – ७३, कुडाळ – ४७, मालवण – ६९, सावंतवाडी – ३७, वैभववाडी – २३, वेंगुर्ले – ३८. एकूण करोनाबाधितांची संख्या ३७ हजार ४५६ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६९६, दोडामार्ग १८२, कणकवली १०३३, कुडाळ १२४८, मालवण १११२, सावंतवाडी ७१५, वैभववाडी २८९, वेंगुर्ले ६७९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २६. सक्रिय रुग्णांपैकी ३१७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९४२ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – कुडाळ १, कणकवली ३, मालवण ३, सावंतवाडी १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३०, दोडामार्ग – २८, कणकवली – १८६, कुडाळ – १४२, मालवण – १७६, सावंतवाडी – १३८, वैभववाडी – ६३, वेंगुर्ले – ७२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply