रत्नागिरी जिल्ह्यात नवे ५९४ करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ जून) करोनाचे नवे ५९४ रुग्ण आढळले. त्यामध्ये यापूर्वी नोंद न झालेल्या जुन्या १०१ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार २९४, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार १९९ (दोन्ही मिळून ४९३). आधीच्या तारखेनुसार १०१ रुग्णांची आज नोंद झाली. त्यांच्यासह आजच्या रुग्णांची संख्या ५९४ झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४६ हजार ५३० झाली आहे. आज झालेल्या चाचण्यांच्या तुलनेने जिल्ह्यातील रुग्णवाढीचा आजचा दर ८.८७ टक्के आहे. हा दर केवळ आजच्या आकडेवारीवर आधारित आहे. प्रत्यक्षात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६.८३ टक्के आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून पाच हजार २९७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज पाच हजार ६७ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख २९ हजार ७८२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ३९२ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३९ हजार ६५९ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८५.२३ टक्के आहे.

जिल्ह्यात कालच्या ७ आणि आजच्या ६ अशा १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ५७४ झाली आहे. मृत्युदर ३.३८ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४७१, खेड १५१, गुहागर १३७, दापोली १२५, चिपळूण ३००, संगमेश्वर १८१, लांजा ८२, राजापूर ११४, मंडणगड १३. (एकूण १५७४).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply