ऊर्मिला चाकूरकर यांच्या साहित्यावर पणजीत चर्चासत्र, कविसंमेलन

पणजी : पैठण (औरंगाबाद) येथील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांच्या साहित्यावर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या गोवा शाखेतर्फे येत्या २ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात चर्चासत्र होणार आहे.

चर्चासत्राचे उद्घाटन माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप असतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी परिषदेचे अध्यक्ष आणि तरुण भारतचे गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर असतील. कोकण मराठी परिषदेच्या सचिव चित्रा क्षीरसागर व्यासपीठावर असतील. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री दीपा मिरिंगकर करतील. यावेळी उर्मिला चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील नामवंत व नवोदित कवी–कवयित्रींचे कविसंमेलन होणार आहे.

उर्मिला चाकूरकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कवितासंग्रह, प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रण आणि बालसाहित्य अशी पुस्तके आहेत. पणजीतील चर्चासत्रात उर्मिला चाकूरकर यांच्या विठोबा आणि कविता संग्रहावर डॉ. नीता तोरणे, डॉ. चाकूरकर यांच्या प्रवास वर्णन आणि व्यक्तिचित्रण विषयक पुस्तकांवर प्रा. सारिका आडविलकर तसेच उर्मिला चाकूरकर यांच्या बालसाहित्यावर ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर भाष्य करतील.

परिसंवादानंतर डॉ. उर्मिला चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात माधव सटवाणी, शरद नरेश, मोहन कुलकर्णी,प्रा. विनय बापट, उदय ताम्हणकर, प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, लक्ष्मण पित्रे, मंगेश काळे, नीतिन कोरगावकर, दयाराम पाडलोस्कर, तुळशीदास काणकोणकर, संदीप मणेरीकर, मेघना कुरुंदवाडकर, केतकी साळकर, डॉ. नीता तोरणे, डॉ. अनिता तिळवे, अंजली चितळे, पौर्णिमा केरकर, अनुजा जोशी शुभदा च्यारी, दीपा मिरिंगकर, अपूर्वा ग्रामोपाध्ये, शीतल साळगावकर, आदिती बर्वे, गौरी कुलकर्णी, आसावरी कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, शर्मिला प्रभू, कविता आमोणकर, स्नेहा सुतार, मंदा सुगीरे, अंजली आमोणकर आदी कवी-कवयित्री सहभागी होणार आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply