रत्नागिरी : येथील फिनोलेक्स अॅकॅडमीच्या दोन प्राध्यापकांना अमेरिकेतील जगविख्यात एनव्हीआयडीआयए कंपनीकडून हार्डवेअर अनुदान मिळाले आहे.


फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विनायक भराडी व प्रा. अमर पालवणकर यांना हे अनुदान मिळाले. एनव्हीआयडीआयए ही अमेरिकेतील कॉम्प्युटरमधील हाय-एन्ड जीपीयू हार्डवेअर बनवणारी कंपनी आहे. हे हार्डवेअर कॉम्प्यटुर गेमिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये महत्त्वाचे असते. कंपनीने दिलेल्या अनुदानामध्ये प्रा. डॉ. विनायक भराडी यांना चार एनव्हीआयडीआयए जेटसानो नॅनो २ जीबी बोर्ड आणि प्रा. अमर पालवणकर यांना एक एनव्हीआयडीआयए जेटसानो नॅनो २ जीबी बोर्ड मिळाले आहेत.
हे हार्डवेअर वापरून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग अल्गोरिदम तयार करता येणार आहेत. ही सुविधा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विभागातील एनव्हीआयडीआयए डेव्हलपर सेंटरमध्ये करण्यात आली आहे.
या दोन प्राध्यापकांच्या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद आणि सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.
विनायक भराडी, अमर पालवणकर
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड