रत्नागिरीत नवे १०३ नवे रुग्ण;  ८२ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३0 सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ८२ रुग्ण करोनामुक्त झाले, तर १०३ नवे करोनाबाधित आढळले. आज दोघा रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७७ हजार ९९२ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९६.०० आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या १०३ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ९९७ पैकी ९५० अहवाल निगेटिव्ह, तर ४७ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १७६० नमुन्यांपैकी १७०४ अहवाल निगेटिव्ह, तर ५६ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ५७ हजार २५९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ४०९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ४५६, तर लक्षणे असलेले २३७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४०९ आहे, तर २८४ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आता एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४७, डीसीएचसीमधील ९०, तर डीसीएचमध्ये १४७ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६९ जण ऑक्सिजनवर, २७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ५.२७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२९ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४२३ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२१, गुहागर १६७, चिपळूण ४७३, संगमेश्वर २१२, रत्नागिरी ८०८, लांजा १२५, राजापूर १६०. (एकूण २४२३).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply