सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नवबाधितांची संख्या ५३ हजारावर

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत १३ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ५३ हजार २५ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज एकाच्या दुबार तपासणीसह नवे १३ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड २, दोडामार्ग ५, कणकवली ०, कुडाळ १, मालवण १, सावंतवाडी २, वैभववाडी ०, वेंगुर्ले १.

जिल्ह्यात सध्या २९१ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी १९ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १३, दोडामार्ग २१, कणकवली ६०, कुडाळ ७४, मालवण ४८, सावंतवाडी ३७, वैभववाडी १५, वेंगुर्ले २०, जिल्ह्याबाहेरील ३.

आज शिरगाव (देवगड) येथील एका ८१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५१ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७९, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९७, कुडाळ – २४१, मालवण – २८८, सावंतवाडी – २०२, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply