pexels-photo-4031867.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे १९ रुग्ण, २४ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (४ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत नवे १९ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर २४ जण बरे वाटल्याने घरी गेले. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज आढळलेल्या नव्या १९ करोनाबाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ५, कणकवली ७, कुडाळ ३, मालवण २, सावंतवाडी १, वैभववाडी ०, वेंगुर्ले ०.

जिल्ह्यात सध्या १६३ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी १८ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १०, दोडामार्ग २२, कणकवली २६, कुडाळ ४१, मालवण २१, सावंतवाडी २४, वैभववाडी ६, वेंगुर्ले १२, जिल्ह्याबाहेरील १.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५२ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७९, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९७, कुडाळ – २४२, मालवण – २८८, सावंतवाडी – २०२, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply