सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७ सक्रिय करोनाबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२७ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार नवा १ रुग्ण आढळला, तर १० रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात सध्या ५७ सक्रिय रुग्ण आहेत.

आजच्या करोनाबाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ०, दोडामार्ग ०, कणकवली ०, कुडाळ ०, मालवण १, सावंतवाडी ०, वैभववाडी ०, वेंगुर्ले ०.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या ५७ रुग्णांपैकी १० रुग्ण ऑक्सिजनवर, तर २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग १, कणकवली १५, कुडाळ १२, मालवण ९, सावंतवाडी ८, वैभववाडी ०, वेंगुर्ले ५, जिल्ह्याबाहेरील १.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५७ एवढीच कायम आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९८, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०३, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

लसीकरणाची स्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत (२७ नोव्हेंबर) एकूण ५ लाख ४१ हजार १२१ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण ९८५५ हेल्थ वर्कर्सनी पहिला डोस, तर ८१५७ हेल्थ वर्कर्सनी दोन्ही डोसेस घेतले. ९९९१ फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला डोस, ८८५२ फ्रंटलाइन वर्कर्सनी दोन्ही डोसेस घेतले. ६० वर्षांवरील १ लाख ३२ हजार १६७ व्यक्तींनी पहिला डोस, तर ८८ हजार ८०१ व्यक्तींनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. ४५ वर्षांवरील १ लाख ५६ हजार ३ नागरिकांनी पहिला डोस, तर १ लाख २९ हजार ९ नागरिकांनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील २ लाख ३३ हजार १०५ जणांनी पहिला डोस, तर १ लाख १५ हजार ११४ व्यक्तींनी दोन्ही डोसेस घेतले आहेत. असे एकूण ८ लाख ६४ हजार ९५४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला २६ नोव्हेंबरपर्यंत एकूण ९ लाख ५१ हजार २६० लशी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये ७ लाख १७ हजार १८० लशी कोविशिल्डच्या, तर २ लाख ३४ हजार ८० लशी कोव्हॅक्सिनच्या आहेत. ६ लाख ७२ हजार २९७ कोविशिल्डचे आणि १ लाख ८८ हजार १७० कोव्हॅक्सिनचे असे मिळून ८ लाख ६० हजार ४६७ डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण १ लाख १७ हजार ६५० लशी उपलब्ध असून, त्यापैकी ७२ हजार ६२० कोविशिल्ड आणि ४५ हजार ३० कोव्हॅक्सिन आहेत. जिल्ह्यात सध्या १९ हजार १६० लशी शिल्लक असून, त्यापैकी १६ हजार २०० कोविशिल्ड आणि २९६० कोव्हॅक्सिन आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply