hand holding petri dish

रत्नागिरी जिल्ह्यात ६ नवे करोनाबाधित; ७ जण करोनामुक्त

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (दि. २७ नोव्हेंबर) करोनाचे ६ नवे रुग्ण आढळले, तर ७ जण करोनामुक्त होऊन घरी गेले. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या कालच्या ४७वरून आज ४६वर आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी करोनाविषयक अहवालात ही माहिती दिली आहे. २३ नोव्हेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ३७ वर आली होती.

आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे ६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ८० झाली आहे. आज ७ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५५५० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८० आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५५७ पैकी ५५५, तर रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ४४४ पैकी ४४० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. दोन्ही प्रकारच्या चाचण्यांत अनुक्रमे दोन आणि ४ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ३२ हजार ५७० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात ४६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात लक्षणे नसलेले २१, तर लक्षणे असलेले २५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २१ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात २५ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ११, तर डीसीएचमध्ये १४ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ६ जण ऑक्सिजनवर, ३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१४ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४८४ एवढीच कायम आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२१, खेड २२८, गुहागर १७३, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२७, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४८४).

लसीकरणाची स्थिती

जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या ६४ लसीकरण सत्रांत १२७० जणांनी करोनाप्रतिबंधक लशीचा पहिला, तर ४३०१ जणांनी दुसरा डोस घेतला. २६ नोव्हेंबरपर्यंतच्या एकूण स्थितीनुसार, जिल्ह्यातील ९ लाख ४७ हजार १५५ जणांनी पहिला, तर ४ लाख ४९ हजार ७४७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण १३ लाख ९६ हजार ९०२ जणांचे लसीकरण झाले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply