coronavirus

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ सक्रिय करोनाबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१२ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात नवे दोन करोनाबाधित रुग्ण आढळले, तर दोघे जण बरे होऊन घरी गेले. आज कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.

सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३४ असून आतापर्यंत ५१ हजार ७२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २१६ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १४६० रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या ३४ रुग्णांपैकी ५ रुग्ण ऑक्सिजनवर, तर एक रुग्ण चिंताजनक असल्याने व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग ०, कणकवली ५, कुडाळ ५, मालवण ७, सावंतवाडी ८, वैभववाडी ०, वेंगुर्ले ३, जिल्ह्याबाहेरील ०.

आज एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६० एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०४, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply