pexels-photo-3952231.jpeg

सिंधुदुर्गात दुबार तपासणीचा एकमेव करोनाबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुबार तपासणी केलेला करोनाचा एकमेव रुग्ण आज आढळला. आज कोणीही रुग्ण करोनामुक्त झाला नाही किंवा एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

आज (१३ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३४ असून आतापर्यंत ५१ हजार ७२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २१६ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १ हजार ४६० रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या २७ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. एक रुग्ण चिंताजनक असल्याने व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग ०, कणकवली ५. कुडाळ ५, मालवण ७, सावंतवाडी ८, वैभववाडी ०, वेंगुर्ले ३, जिल्ह्याबाहेरील ०.

आज एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६० एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०४, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply