आंतरराष्ट्रीय सहकार दिनी स्वरूपानंद पतसंस्थेत एक कोटीच्या ठेवी

रत्नागिरी : एक कोटीपेक्षा जास्त ठेवी एकाच दिवशी जमा करत येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आंतरराष्ट्रीय सहकार दिन दणक्यात साजरा केला. पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

दरवर्षी २ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा केला जातो. त्यादिवशी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ग्राहकांनी १ कोटी २ लाखाच्या ठेवी जमा केल्या. सहकाराचे, समानतेचे, परस्पर सहयोगाचे तत्त्व प्रवाही राहावे, सहकाराची महती प्रवाही राहावी, यासाठी जगभरामध्ये २ जुलै रोजी सहकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याला अनुलक्षून स्वरूपानंद पतसंस्थेच्या विश्वासार्ह अर्थकारणावर विश्वासून ठेवीदारांनी सहकारातील या आग्रनामांकित संस्थेत गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले आहे. संस्थेच्या एकूण ठेवी २५७ कोटी झाल्या असून या ठेव वृद्धीमासात ५ कोटी ६० लाखाचे ठेव संकलन पहिल्या ११ दिवसांतच झाले आहे.

प्रतिवर्षी ठेववृद्धी मासात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार संस्थेच्या विश्वासार्ह ठेव योजनांत ठेव गुंतवत असतात. संस्थेची विश्वासार्हता अधोरेखित करणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ठेवीदार आणि विश्वासार्ह स्वरूपानंद पतसंस्था हे ऋणानुबंध प्रतिवर्षी अधिक दृढ होत आहेत संस्थेच्या ठेवीदारांची संख्या २१ हजारपेक्षा अधिक झाली आहे. जनमानसात सर्वदूर स्वरूपानंद संस्था सर्वमान्य झाली असल्याचे हे द्योतक आहे, असे भावोद्गार श्री. पटवर्धन यांनी काढले. स्वरूपानंद पतसंस्थेच्या स्वरूपांजली तसेच सोहम ठेव योजनेत आकर्षक तेवढ्याच सुरक्षित ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन ॲड. पटवर्धन केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply