सायकलफेरीने रत्नागिरीत मतदार जनजागृती

रत्नागिरी : मतदार जागृती, मतदानकार्डासाठी नोंदणी करणे आणि मतदानकार्ड आणि आधारकार्ड जोडण्याचा प्रचार, प्रसिद्धीसाठी आज रत्नागिरीत सायकल फेरी निघाली.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, जिल्हा प्रशासन, प्रांत आणि तहसीलदार कार्यालय आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने याचे नियोजन केले. फेरीमध्ये सायकलपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभाग घेतला. ही फेरी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून सुमारे दहा किलोमीटर मार्गावर फिरवण्यात आली.

सकाळी ७.१५ वाजता मारुती मंदिर सर्कल येथून फेरीला सुरवात झाली. तेथून माळनाका, जयस्तंभ, एसटी बसस्थानक, राम आळी, गोखले नाका, काँग्रेस भवन, आठवडा बाजारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील १०० फुटी झेंड्यापर्यंत ही सायकल फेरी काढण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, नायब तहसीलदार माधवी कांबळे, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे योगेश मोरे, दर्शन जाधव, महेश सावंत, विनायक पावसकर, उमेश गोठिवरेकर, योगेश सामंत, मुग्धा सामंत, डॉ. नितीन सनगर, यतिन धुरत, मंगेश शिंदे, समीर धातकर, संदीप पावसकर, राजीव लिमये, मकरंद पटवर्धन, मंदार वायंगणकर, रत्नागिरी सायकलिस्ट ज्युनिअर क्लबचे अर्णव पटवर्धन, अर्णव जोगळेकर, वेद ठाकूर, नीलेश लिमये, मित भुवड आदींसमवेत शासकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply