रत्नागिरी : दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना सायकलवर स्वारी करण्यासाठी सज्ज झालेल्या वीरश्री ट्रस्टच्या सायकल फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून उद्या रविवारी होणार असलेल्या या सायकल फेरीकरिता आज (दि. १० डिसेंबर) रात्री आठ वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे.
फेरी शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी साडेपाच वाजता रत्नागिरीतील शिवाजी नगर येथील मंगळवार आठवडा बाजार येथून फेरीला सुरुवात होणार असून तेथून जयस्तंभ – झरी विनायक ते वायंगणी फाटा आणि त्याच मार्गाने परत ही सायकल फेरी काढण्यात येईल. यात वेगवेगळ्या वयोगटातील सायकलस्वारांसाठी वेगवेगळे अंतर ठेवण्यात आले आले आहे. त्यामध्ये ११ ते १३ वयोगटातील सहभागी मुलांसाठी शिवाजीनगर ते झरी विनायक मंदिर आणि परत शिवाजी नगर असा मार्ग असून १४ वर्षांवरील सायकलस्वारांसाठी शिवाजी नगर ते वा्यंगणी फाटा आणि परत शिवाजी नगर असा मार्ग आहे. सहभागी सायकलपटूंना वीरश्री ट्रस्टतर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात देणार आहे.
सायकल फेरी यशस्वी होण्यासाठी जाणीव फाउंडेशनचे महेश गर्दे, उमेश महामुनी, लायन्स क्लबचे प्रवीण जैन, ओंकार फडके, पराग पानवलकर, संतोष बेडेकर, यांच्यासह अनेकजण सहकार्य करत आहेत. कौमुदी बिल्डर्सचे संतोष तावडे, हिंद सायकल मार्टचे मंगेश शिंदे, मणेर सायकल मार्ट, डॉ. पिलणकर, समाजसेविका प्राची शिंदे, लोकमान्य पतपेढीचे वीरेंद्र ठाकूर आणि अंजली कुलकर्णी बहुमोल सहकार्य करत आहेत.
सायकल फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या link द्वारे नोंदणी करण्याचे आवाहन वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे आणि उपाध्यक्षा डॉ. तोरल शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9960302785 या क्रमांकावर संपर्क साधावा.
फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी अजूनही ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांच्यासाठी लिंक –
https://forms.gle/ZAegZz6ZBvKytvgB6

